सोलापूर । शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती मान्यवरांच्या हस्ते लेखणी व नवीकोरी पुस्तके देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. सुटीनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत होता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील राऊंड टेबल जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी दी. शि. कमळे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय कोले, सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळाचे सहसचिव प्रा. सुबोध कोळी, उद्योजक धनेश कडते आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखणी देऊन स्वागत करण्यात आले. या वेळी पोलिस पाटील कैलास कडते, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, शशिकांत बनसोडे, शिक्षणप्रेमी राहुल उडाणशिव, केदार नानाजे, उमेश कोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्रशालेच्या प्राचार्यपदी आर. बी. यलगोंडे व पर्यवेक्षकपदी एस.बी.जमादार यांची पदोन्नतीवर निवड झाल्याबद्दल संजय कोले, प्रा. सुबोध कोळी, धनेश कडते व सोमनाथ जोकारे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9