
सोलापूर : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी-पीसीएम गटाच्या फर्स्ट अटेम्प्ट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. 34 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली.
महाविद्यालयातील अनिकेत खडके या विद्यार्थ्याने 99.89 पर्सेंटाईल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्यासह रेवनेश सुतार – 99.83, स्वयम वनकुद्रे – 98.58, सोनाली नंदी – 98.19, अनुष्का बब्बूर – 97.80, प्रणव साखरे – 96.59, श्रद्धा कापसे – 96.40, नितीन कोंकटी – 95.94, आकांक्षा सुतार – 95.93, कोमल हुक्केरी – 95.68, गुलनाज पठाण – 95.31, वैष्णवी अल्लोली – 95.13, ओंकार श्रीपुरम – 95.12, मोहम्मद झियान चौधरी – 95.07, समर्थ चिप्पा – 94.48, सुकन्या साखरे – 93.88, सबरीन मुजावर – 93.84, ओंकार साबळे – 93.72, अमूल्या होतगोंड – 93.72, समर्थ उन्नद – 93.70, मधुमाला चव्हाण – 93.00, रमजान शेख – 92.56, नोमान पीरजादे – 92.52, श्रवण पटेल – 92.49, अनिकेत इराबत्ती – 92.15, वैष्णवी चोपडे – 91.95, घनशाम नक्का – 91.25, हर्षवर्धन शितोळे – 90.82, तनुश्री चिन्नी – 90.62, आर्यन वेर्णेकर – 90.51, मनीषा कनकुंटला – 90.23, विशांत गंदगे – 90.12, रसिका साळुंखे – 90.12, पूनम साखरे – 90.04 , यांनी विशेष यश मिळविले.
याशिवाय अनेक विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा अधिक पर्सेंटाईल प्राप्त करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक व महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व विश्वस्त ,प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे तसेच सीईटी समन्वयिका सारिका महिंद्रकर यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.























