सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 40 वर्षीय रिक्षा चालकाने घरातील छताच्या लाकडीवाशाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोरेगाव परिसरातील पंचवटी नगरात आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली .
शिवशंकर अंबादास देशमुख ( वय 40 वर्ष , रा. प्लॉट नंबर 50 , एस आर पी एफ कॅम्प मागे , पंचवटी नगर , सोरेगाव सोलापूर ) असे त्या गळफास घेतलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे . आज बुधवारी दुपारी घरात कोणी नसताना शिवशंकर याने स्वतःला गळफास लावून घेतला . ही घटना शेजारच्यांच्या निदर्शनास पडली असता त्यांनी नातेवाईकांना कल्पना दिली . दरम्यान ही माहिती विजापूर नाका पोलिसांना समजली असता हवालदार व्हि . डी . गायकवाड यांनी घटनास्थळी पोहचून सदरचा मृतदेह इतरांच्या साह्याने खाली उतरून येथील शासकीय रुग्णालयात दुपारी तीन वाजता शव विच्छेदनासाठी दाखल
केला . मयत शिवशंकर देशमुख च्या पश्चात आई वडील , पत्नी , दोन मुले , दोन मुली , असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 14