Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
June 17, 2026
in solapur
0
बेला फौंडेशनच्या चित्रकला-बुद्धिबळ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अककलकोट – श्री स्वामी समर्थ राजेराय मठ, अक्कलकोट येथे बेला फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छंद वर्ग समारोप तसेच चित्रकला व बुद्धिबळ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचा मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात पार पडला.
श्री स्वामी समर्थ राजेराय मठातील पादुका स्थापनेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तसेच सद्गुरू बेलानाथ महाराज यांच्या २३ व्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छंद वर्ग, चित्रकला स्पर्धा व बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी आपली कला, कल्पकता, बौद्धिक क्षमता व सर्जनशीलता यांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मठाचे अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे होते. व्यासपीठावर मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके , मठाचे सचिव डॉ. किसन झिपरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर व मठाच्या विश्वस्तांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत बेला फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. श्रद्धांक झिपरे यांनी केले.
यावेळी चित्रकला, बुद्धिबळ स्पर्धा व छंद वर्गामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके, प्रमाणपत्रे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे, मेहनतीचे व यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मठाचे सचिव डॉ. किसन झिपरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांच्या कलागुणांचे, मेहनतीचे व स्पर्धेतील यशाचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता व स्पर्धात्मक वृत्ती वाढीस लागते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
छंद वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाटक व विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे समारंभाचे विशेष आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली व सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सादरीकरणासाठी अतुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करून परिश्रम घेतले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे, शिस्तबद्धतेचे व कलाविष्काराचे कौतुक करत त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती करण्यासाठी प्रेरित केले.
कार्यक्रमाचे ओघवते व प्रभावी सूत्रसंचालन अतुल जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुष्पा जाधव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी, सेवेकरी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बेला फौंडेशनच्या नामीत झिपरे, धनंजय गायकवाड, पुष्पा जाधव, अमृता पोतदार, जनक झिपरे, रतिकांत पाटील, जयसिंग बर्वे, आनंद पाटील, अमरीश तसेच कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर श्री स्वामी समर्थ राजेराय मठातील सर्व सेवेकरी व विद्यार्थ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व यशस्वी आयोजन होऊ शकले.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, भक्तगण, सेवेकरी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाले असून त्यांच्या आत्मविश्वासात वाढ होण्यास मदत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Post Views: 10
Previous Post

सोरेगाव परिसरात रिक्षा चालकाची गळफासाने आत्महत्या

Next Post

श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचल्यास मंदिरे समिती व पुरातत्त्व विभागावर फौजदारी खटला दाखल करू !

ताज्या बातम्या

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

डॉ. गायत्रीचे यश समाजासाठी प्रेरणादायी – महेश पंडीत

June 17, 2026
पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

पांडुरंगाने दिली सेवेची संधी; वाढती गर्दी गृहीत धरून आषाढी वारीचे हायटेक नियोजन – सीईओ कुशल जैन

June 17, 2026
औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

औषधी वनस्पती उद्यान ठरतेय नवसंजीवनी; रुग्ण, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी ज्ञान, उपचार व संवर्धनाचा प्रभावी दुवा

June 17, 2026
बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

बैलगाडी सफरने उत्कर्ष विद्यालयाचा प्रवेशोत्सव

June 17, 2026
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

June 17, 2026

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोघांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू

June 17, 2026
खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

खाजगी शाळांच्या मनमानीमुळे पालक त्रस्त; शिक्षण विभागाकडे कारवाईची मागणी

June 17, 2026
कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

कन्हेरगावच्या वाड्या-वस्तीवरील सिंगल फेज वीजपुरवठ्यासाठीचे आमरण उपोषण यशस्वी

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0915158

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697