Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पंढरपूर येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान

तरुण भारतbyतरुण भारत
June 18, 2026
in solapur
0
विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पंढरपूर येथील मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यातील विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणूकीसाठी गुरुवारी (दि.१८) पंढरपूर केंद्रावर शंभर टक्के मतदान झाले. या निवडणूकीत बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत हे भाजपाकडून तर पंढरपूर येथील राष्ट्रवादी (श.प.गट) काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या मध्ये लढत होत आहे. या दोघांचेही भवितव्य आता मतदान पेटी मध्ये बंद झाले आहे. त्यामुळे येथील मतदारांनी दोघांपैकी नेमका कोणाला कौल दिला या बद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. या निवडणूकीचा निकाल येत्या सोमवारी (दि.२२) लागणार आहे.
दरम्यान गुरुवारी सकाळी येथील तहसील कचेरी मधील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. सकाळी आठ ते चार या वेळात ही मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रिया पुर्णपणे शांतते मध्ये पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यावेळी मतदान केंद्राच्या बाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. येथील तहसीलदार, प्रांताधिकारी सातत्याने मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. पंढरपूर मतदान केंद्रावर एकुण शंभर एवढी मतदारांची संख्या होती. त्या मध्ये ५४ पुरुष आणि ४६ स्त्री मतदारांचा समावेश होता. सकाळी आठ ते दुपारी १२ वाजे पर्यंत १७ पुरुष आणि १३ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता त्या मुळे सकाळच्या या सत्रात मतदानाची टक्केवारी अवघी ३० टक्के ऐवढी होती. त्या नंतर सकाळी आठ ते दोन वाजे पर्यंत ५३ पुरुष तर ४१ महिला मतदारांनी आपले मतदान केले होते. त्यामुळे मतदानाची एकुण टक्केवारी ९४ टक्यांपर्यंत गेली होती. दरम्यान मतदानाची वेळ संपताना अर्थात दुपारी चार वाजे पर्यंत ५४ पुरुष आणि ४६ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यामुळे पंढरपूर केंद्रावर मतदानाची टक्केवारी शंभर इतकी झाली.
दरम्यान गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या निवडणूकीसाठी येथील महायुतीचे पदाधिकारी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, शिवसेनेचे अनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली आपआपल्या मतदारांशी संपर्क साधण्याचे काम करीत होते. भाजपाचे उमेदवार राजाभाऊ राऊत यांनी देखील येथे येवून महायुतीमधील भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे गट ),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच मित्रपक्षाच्या मतदारांच्या गाठीभेटी घेवून गेलेले होते. यावेळी त्यांनी देखील विरोधी पक्षातील मतदारांशी देखील आपला चांगला संपर्क आहे.  ही जिल्ह्याची निवडणूक आहे. त्यामुळे आपला, परका असे या निवडणूकीत काही नाही. अनेक अदृष्य शक्ती आम्हाला मतदानासाठी उत्सुक असल्याचे सांगून आम्ही सर्व मतदारबंधुभगिनींशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून आहोत अशी प्रतिक्रिया दिलेली होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झालेली होती. कारण पालकमंत्र्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुरुवातीला प्रयत्न केलेले होते. मात्र त्या मध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी जिंकण्यासाठी त्यांनी आपली संपुर्ण ताकद पणाला लावली होती. त्यामुळे महायुती मधील घटक पक्ष असलेल्या सर्व आमदार,पदाधिकारी यांना पालकमंत्र्यांनी व्यक्तीश: वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देवून निवडणूकीत जास्तीत जास्त मतदान आपल्या पारड्यात खेचून आणण्यासाठी कामाला लावलेले दिसून आले.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या प्रचारासाठी आपली ताकद पणाला लावली होती. जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी ही निवडणूक जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेंमधील मतदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असून अनेक अदृश्यशक्ती सोलापूर जिल्ह्याचा स्वाभिमान जागृक ठेवण्यासाठी तसेच आपल्या जिल्ह्याचा ताठ कणा,बाणा अबाधित ठेवण्यासाठी आमच्या संपर्कात असल्याचे सूतोवाच केले होते.
त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी पालकमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्या उमेदवाराला आपल्या मतदारांचा पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची थोडी ताकद ऐनवेळेला कमी झालेली दिसत होती. तरी देखील ऐन उन्हाळ्यात सुध्दा आमचा वसंत फुलणार अशी नेमकी आणि मार्मिक प्रतिक्रिया देवून राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते यांनी आपले उमेदवार वसंतराव देशमुख यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात असल्यामुळे या निवडणूकीत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार या बद्दलचा फैसला आता येत्या सोमवारी (दि.२२) मतमोजणी नंतर समोर येणार आहे.
—————–
चौकट : ( पालकमंत्र्यांकडून वैयक्तीक गाठीभेटी )
जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने विधानपरिषदेची निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती. कारण जिल्ह्याची धुरा पालकमंत्र्यांच्या खांद्यावर असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्र्यांवर या निवडणूकीची संपुर्ण जबाबदारी सोपविलेली होती. त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी येथील मनसेचे नेते दिलीप धोत्रे,शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे येथील नेते अनिल सावंत तसेच शिवसेनेचे मंत्री उदय सावंत यांच्या मार्फत पंढरपूर पालिकेच्या नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके आणि त्यांचे पती भगिरथ भालके यांच्याशी देखील संपर्क साधुन एक, एक मतांसाठी व्युहरचना आखली होती. त्यामुळे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे भाजपाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी अबकी बार पाचशो पार चा नारा दिला आहे. त्यामुळे महायुतीकडून दिलेला पाचशे पार चा नारा कितपत खरा ठरतो हे आता मतमोजणी नंतर समजू शकणार आहे. त्यावरच पालकमंत्र्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली की नाही हे सष्ट होणार आहे.
Post Views: 87
Previous Post

ब्रिज खाली दोन गट मारहाण, धमक्या व रोकड काढून घेतल्याचा आरोप

Next Post

‘दास्ताने’ व ‘सलीम खान’ संघांची विजयी सलामी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘दास्ताने’ व ‘सलीम खान’ संघांची विजयी सलामी

'दास्ताने' व 'सलीम खान' संघांची विजयी सलामी

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1030160

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!