
कोरोना काळात वडील कै. मनोज रामराव पाटील यांचे अकाली निधन झाल्यानंतर कुटुंबावर मोठे संकट ओढवले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही धिरज यांनी खचून न जाता शिक्षणाची वाट सोडली नाही. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत आणि शेतीची कामे करत त्यांनी उपलब्ध वेळेत ऑनलाइन माध्यमातून सीए परीक्षेची तयारी केली.
कठोर परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि यश मिळविण्याची जिद्द यांच्या जोरावर त्यांनी सीएसारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या यशामागे कुटुंबीयांचे पाठबळ, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि वडिलांच्या आठवणींनी दिलेली प्रेरणा महत्त्वाची ठरली.धिरज पाटील यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून प्रतिकूल परिस्थितीतही मोठी स्वप्ने पूर्ण करता येतात, हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे.
























