श्रीपूर येथिल कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्या मार्फत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियाना अंतर्गत ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते .
समारंभाच्या अध्यक्षस्थान कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी होते .
प्रथम प्रथम प्रास्ताविकामध्ये डॉक्टर कुलकर्णी यांनी कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या कृतीतून घालून दिलेल्या आदर्शा प्रमाणे पांडुरंग परिवार वाटचाल करत असल्याने येथिल वातावरण निकोप आसल्याचे सांगितले .
पुढे बोलताना डॉॅ . करंदीकर यांनी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे ओळखण्या साठी वाईट शक्ती पासून लांब राहण्यासाठी संताचे विचाराचे मनन , चिंतनाची आवश्यकता , याबरोबरच सहनशिलता अंगी बाणवणे, चांगल्या विचारांप्रति आत्मविश्वास निर्मीण होणे व सर्वात महत्वाचे म्हणजे लहानां कडे बघून जगा व मोठ्यां कडून शिका हा मुल मंत्र समोर ठेवणेचे आवाहन केले .
या प्रसंगी मुख्य शेती अधिकारी संतोष कुमठेकर, मुख्य रसायनतज्ञ एम . आर . कुलकर्णी , वर्क्स मॅनेजर अमोत बारटक्के , मुख्य लेखापाल रविंद्र काकडे, परचेस मॅनेजर महेश देशपांडे,ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, अधिकारी तानाजी भोसले , सचिन विभूते, रमेश गाजरे, सेक्रेटरी भिमराव बाबर, उपस्थित होते .
सुत्रसंचालन डॉ . सुधीर पोफळे तर आभार सेफ्टी ऑफीसर भालशंकर यांनी मानले.
























