Tuesday, November 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
June 18, 2026
in political
0
मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि शक्ती दाखवून दिली. सकाळपासूनच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर नगरसेवकांची उपस्थिती लक्षणीय होती.
       निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सकाळी मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले. भाजपच्या 95 पैकी 93 नगरसेवकांना नियोजनबद्ध पद्धतीने मतदानासाठी आणण्यात आले होते. भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झाले आहे तर  नगरसेवक रुद्रेश बोरामणी हॆ परदेशात आहेत.तीन प्रभागांतील १२ नगरसेवकांचा एक गट तयार करून त्यांचे मतदान सुरळीत पार पडावे यासाठी स्वतंत्र समन्वयक नेमण्यात आले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली  आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल  , सभागृह नेते नरेंद्र काळे  यांनी संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले.
        मतदानासाठी येताना ओळखपत्र, मतदान कार्ड आणण्याबाबत तसेच मोबाईल व पेन मतदान केंद्रात न नेण्याच्या सूचना नगरसेवकांना देण्यात आल्या होत्या. सकाळी ९ वाजल्यापासून महिला आणि पुरुष नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदानास सुरुवात केली. दुपारी १ वाजेपर्यंत भाजपच्या सर्व नगरसेवकांचे मतदान पूर्ण झाले.
         दरम्यान, एमआयएमचे 9, शिवसेना 4 व काँग्रेसच्या 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 1 या नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 111 पैकी 109 नगरसेवकांनी मतदान केले. भाजप कडील एक स्वीकृत नगरसेवक पद रिक्त आहे. दरम्यान, यावेळी  शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे उपस्थित होते. मतदान केंद्राबाहेर दिवसभर राजकीय घडामोडींवर चर्चा रंगली होती.
          मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
 नगरसेविका शालन शिंदे यांनी
पोलीस बंदोबस्तात केले मतदान
मनसे पदाधिकारी युवराज सरवदे यांच्या खूनप्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना सकाळी पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर आणण्यात आले. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयीन कोठडीत नेण्यात आले. या घटनेची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती.
Views: 347
Previous Post

विधानपरिषद निवडणुकीसाठी ६ केंद्रांवर शांततेत पार पडले मतदान

Next Post

कुर्डूवाडी येथे शंभर टक्के मतदान संपन्न 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कुर्डूवाडी येथे शंभर टक्के मतदान संपन्न 

कुर्डूवाडी येथे शंभर टक्के मतदान संपन्न 

ताज्या बातम्या

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

#diwalispecial #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1484697

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!