
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य बजरंग नरुटे सर होते. तसेच ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचा स्टाफ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करुन सर्वांना मार्गदर्शन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर बक्षीस वितरणानंतर ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षांनी शैक्षणिक साहित्य देणगीदारांचे आभार मानले व यापुढेही असेच सोबत राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घावटे यांनी केले.























