सांगोला – सूर्यफुलाचे शंभर टक्के मोफत बियाणे कृषी विभाग, सांगोला येथे उपलब्ध झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांना सूर्यफुलाचे बियाणे आवश्यक आहे, त्या सर्व शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज ऑनलाईन करण्याचे आवाहन कृषी विभाग सांगोला यांचे तर्फे करण्यात आले आहे. तसेच बाजरी पिकाचे गटासाठी मोफत बियाणे उपलब्ध झालेले आहे, तरी इच्छुक शेतकरी गटांनी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करावेत.
ज्या शेतकरी बांधवांनी यापूर्वी तूर, मका, सूर्यफूल, बाजरी, मूग, उडीद पिकासाठी ऑनलाईन केलेले आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांनी संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी विभाग, सांगोला यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभाग सांगोला यांचे तर्फे करण्यात आले आहे.
Post Views: 13