
सोलापूर – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या सीईटी-पीसीएम गटाच्या सेकंड अटेम्प्ट परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या 42 विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजेशी कामगिरी केली. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे तसेच सीईटी समन्वयिका सारिका महिंद्रकर यांनी अभिनंदन केले.
अनिकेत खडके याने 99.89 पर्सेंटाइल मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्यासह रेवणेश सुतार (99.83), स्वयम वनकुद्रे (98.58), सोनाली नंदी (98.19), अनुष्का बब्बूर (97.80), समर्थ उन्नद (97.03), अमृता वाघमोडे (96.80), प्रणव साखरे (96.70), श्रद्धा कापसे (96.40), नितीन कोंकती (95.94), आकांक्षा सुतार (95.93), कोमल हुक्कीरे (95.68), सुयश माने (95.61), सार्थक पाटील (95.59), हसिनी शेगुरे (95.19), वैष्णवी अल्लोळी (95.13), ओंकार श्रीपुरम (95.12), मोहम्मद झियान चौधरी (95.07), समर्थ चिप्पा (94.48), प्रियंका एडके (94.33), ओंकार साबळे (93.72), अमूल्या होटगोंड (93.72), मधुमाला चव्हाण (93.00), सुचित्रा पांगती (92.80), कीर्ती द्यावरकोंडा (92.75), रमजान शेख (92.56), एम. नोमान पीरजादे (92.52), श्रवण पटेल (92.49), अनिकेत इराबत्ती (92.15), वैष्णवी चोपडे (91.95), वेदिका बोडा (91.73), शिवलीला खोबरे (91.37), घनश्याम नक्का (91.25), समर्थ येळे (90.92), वेदांत आडम (90.92), हर्षवर्धन शितोळे (90.82), आर्यन वेर्णेकर (90.51), विशाल गंडगे (90.25), मनीषा कंकुंटला (90.23), रसिका साळुंके (90.12), सोहम चराटे (90.10) आणि पूनम साखरे (90.04) यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.




















