
सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील मेकॅनिकल विभागातील दिगंबर कोळेकर, पृथ्वीराज बैस आणि चेतन सावंत या विद्यार्थ्यांची पुणे येथील डॅना टीएम४ इंडिया प्रा.लि कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर यांनी दिली. ही कंपनी ऑटोमोबाईल, व्यावसायिक वाहने, ऑफ-हायवे वाहने, रेल्वे, मोटरस्पोर्ट्स आणि मनोरंजनात्मक वाहनांसाठी उपयुक्त अशा लो-व्होल्टेज आणि हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक मोटर्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि कंट्रोल सिस्टीम्स यांचे डिझाइन व उत्पादन करते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक तंत्रज्ञान क्षेत्राकडे टाकलेले हे आत्मविश्वासपूर्ण पाऊल असून फॅबटेकचे विद्यार्थी उद्योगविश्वात आपला ठसा उमटवत आहे. प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे, उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.धनंजय शिवपुजे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.राहूल औताडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 6