सांगोला – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जागतिक आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण जगभरात गेल्या १२ वर्षांपासून दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. सांगोल्यातील चैतन्य हास्य योग मंडळाच्या वतीने उद्या जागतिक योग दिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सांगोला विद्यामंदिर येथे सकाळी सव्वा सात वाजता संपन्न होणार आहे. या विशेष उपक्रमात सांगोला शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिगंबर जगताप यांनी केले आहे. निरोगी आणि तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगासनांचे महत्त्व जनमानसात रुजवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश आहे. उद्या सकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात विविध योगासने, प्राणायाम आणि हास्य योगाचे विशेष सत्र आयोजित करण्यात आले आहे.