पिलीव – माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती ( पिलीव) गावात रिक्त असणाऱ्या आशा स्वयंसेविका च्या एका जागेसाठी अर्ज मागविण्यात आले होते .यासाठी गावातील जवळपास 14 महीलांनी रितसर अर्ज केले होते .आरोग्य खात्याच्या निकष व नियमानुसार आलेल्या सर्व अर्जाची रितसर छाननी करुन याठिकाणी योग्य त्या गावातील महिलेची या जागेवर नियुक्ती करणे आवश्यक होती .पण याठिकाणी गावातील आलेल्या सर्व महीलांना डावलून याठिकाणी गारवाड येथील नसीमा नदीम आतार यांची याठिकाणी आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती केली आहे .या नियुक्तीला झिंजेवस्ती येथील सर्वच ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे .याबाबत पिलीव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास जाधव यांनी सदरची नियुक्त केलेली झिंजेवस्ती येथील रहिवाशी नाहीत त्यांच्या आधार कार्डवरील पत्ता हा गारवाड ( मगरवाडी ) असल्याचे म्हटले आहे.तर 29 मे रोजी झालेल्या ग्रामसभेत माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल मदने सर यांनी सदरच्या आशा स्वयंसेविका च्या नेमणुकीबबाबत प्रशासक कोळी व सचिव यांना विचारले असता त्यांनी याबाबत उत्तर देण्यास टाळाटाळ केली .याठिकाणी चुकीच्या पद्धतीने नियुक्त केलेल्या आशा स्वयंसेविका च्या नियुक्ती विरोधात झिंजेवस्ती येथील ग्रामस्थांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे, जिल्ह्य वैद्यकीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर, माळशिरस पंचायत समीतीचे सभापती, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती यांच्याकडे लेखी तक्रार करुन ताबडतोब सदरची नियुक्ती रद्द करावी व झिंजेवस्ती गावातीलच महीलेची निवड करण्याची मागणी केली आहे . चौकट _ या निवडीबाबत माळशिरस तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जानकर यांना विचारले असता ही निवड पुर्ण पणे पारदर्शक व शासनाच्या नियमानुसार केली आहे.त्यांनी दिलेले सर्व पुरावे गावातीलच आहेत.यामध्ये ग्रामपंचायतीने हरकत घेणे आवश्यक आहे.सर्व दिलेल्या पुराव्यानिशी व शासनाच्या नियमानुसारच निवड केली आहे.या तक्रारीत कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...














