सोलापूर – सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनतर्फे वरिष्ठ गट क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी रविवार २८ जून रोजी इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सकाळी ११:०० वाजता सुरू होईल.
निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी खेळाडू नोंदणी फी भरून त्याच्या पावतीची एक झेरॉक्स प्रत निवड चाचणीच्या दिवशी सोबत आणणे आवश्यक आहे.या निवड चाचणीचे परीक्षण करण्यासाठी निवड समितीचे चेअरमन रोहित जाधव यांच्यासह दत्ता बडगु, अमोल आंगडी, अंबादास तोरा, राजेश बंब, जावेद जमादार आणि चंद्रकांत रेंबर्सू हे काम पाहणार आहेत.
सर्व खेळाडूंसाठी रिपोर्टिंग टाईम सकाळी ११:०० वाजण्यापूर्वीचा असून, वेळेत हजर राहणाऱ्या खेळाडूंचीच निवड चाचणी घेतली जाईल, असे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबर्सू यांनी कळविले आहे.















