सोलापूर: जुनी मिल कंपाऊंड मुरारार्जी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 21 जून अर्थात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या योग प्रशिक्षिका सौ. शांता संगा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा यांच्या हस्ते स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे, स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश अण्णा कोठे, विद्येची देवता देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर योग दिन ची सुरवात करण्यात आली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या सौ. शांता संगा यांचा गुलाबपुष्प वृक्ष, शाल, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सदर आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून
प्रमुख पाहुण्या योग प्रशिक्षिका सौ. शांता संगा यांनी विविध आसानाचे प्रात्यक्षिक सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षक यांनी दंड स्थितीतील , बैठक स्थितीतील, पोटावरील व पाठीवरील आसने , प्राणायाम, ध्यान केले. यानंतर शाळेतील इयत्ता 5 वी तील विद्यार्थी कुमार यशराज कोरे यांनी संगीताच्या तालावर लयबद्ध असे आसने सादर केली.
या वेळी प्रमुख पाहुण्या सौ. शांता संगा यांनी दररोज किमान 15 मिनिटे वेळ काढून योग, प्राणायाम ध्यान केला पाहिजे, त्या मुळे आपले शरीर निरोगी व सुदृढ बनते तसेच अनुवंशिक आजार होत नाहीत.
या बरोबरच शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी प्रगती काकडे व कुमारी करीना धोटे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस का साजरा केला जातो याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
सदर योग दिन यशस्वी करण्यासाठी संस्थाअध्यक्ष माननीय श्री. डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे ,उपाध्यक्ष माननीय आमदार श्री . देवेंद्र दादा कोठे, सचिव माननीय श्री .प्रथमेश दादा कोठे, डॉक्टर सौ. राधिकाताई चिलका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर योग दिन यशस्वी करण्यासाठी शाळेतील क्रीडा शिक्षक अतुल सोनके, आशुतोष जाधव तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 407