
सोलापूर – महाराष्ट्र राज्याचे MSEB विभागाचे प्रमुख एम.डी. औंडीकर यांचा सोलापूर दौरा नियोजित होता त्याप्रसंगी बालाजी सरोवर येथे त्यांचा आदिवासी पारधी समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील तरुण व तरुणी यांनी शासनाची आय.टी.आय. परीक्षा उत्तीर्ण होऊन एम एस ई बी विभागात इलेक्ट्रिशन अप्रेनशिप कोर्स करून जवळपास दोन ते तीन वर्ष होत आले त्यांना अद्याप पर्यंत नोकरीमध्ये समाविष्ट करून न घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
एक वर्षाखाली दि. 9/6/2025 रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरे साहेब यांना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी निवेदन दिले होते. त्याची दखल घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एम एस ई बी विभागाला पत्रव्यवहार केला होता परंतु अद्याप पर्यंत आदिवासी पारधी समाजातील तरुण व तरुणीला नोकरीची संधी दिली गेलेली नव्हती ही बाब महाराष्ट्र राज्य MSEB विभागाचे प्रमुख (MD) औंडीकर यांच्या निदर्शनास आणून दिल्याने तात्काळ समक्ष हजर असलेले MSEB सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांना सदर आदिवासी समाजातील तरुण व तरुणींना तात्काळ नोकरीची संधी उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील आय.टी.आय. कोर्स करून एम एस सी बी विभागात इलेक्ट्रिशन अप्रेनशिप कोर्स केलेले तरुण व तरुणी यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका राजश्री चव्हाण व सामाजिक तळमळ असलेले सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश येणार आहे. सदर सत्कार समारंभ प्रसंगी सामाजिक तळमळ असलेले कार्यकर्ते अनिल भि. चव्हाण, सिद्धाराम चव्हाण, सुमित चव्हाण, आशुतोष चव्हाण आदी उपस्थित होते.




















