सोलापूर – अभिनव सामाजिक संस्था सोलापूर यांच्यावतीने सर्व धर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 जून बुधवारी सकाळी ठीक 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत समाज कल्याण केंद्र हॉल, जिल्हा परिषद समोर रंगभवन सोलापूर या ठिकाणी केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन समाजातील ज्येष्ठ समाजसेवक व या कार्यातील अनुभवी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. खरंतर आजच्या व्यस्त जीवनशैलीत योग्य जीवन साथी शोधणे हे पालकांसाठी मोठे आव्हान बनले आहे.
या पार्श्वभूमीवर समाजातील उच्चशिक्षित, व्यावसायिक, नोकरदार तसेच इतर सर्व स्तरातील विवाह इच्छुक तरुण व तरुणींना आणि त्यांच्या पालकांना एकत्र येऊन विचार विनिमय करता यावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात सर्व जाती व धर्माचे विवाह इच्छुक तरुण व तरुणीनी उपस्थित रहावे.
मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ज्या पालकांना आपल्या पाल्याची किंवा तरुण व तरुणीन्ना नाव नोंदणी करायची आहे त्यांनी 8263008913 या संपर्क क्रमांकावर आपले नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सौ मीनल रविकिरण दास यांनी केले आहे.





















