सोलापूर : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटीकल एज्युकेशन अँड रिसर्च (NIPER), जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन(JEE) 2026 चे राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आले होते. या परीक्षेत दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूरच्या एकूण सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सदर विद्यार्थी CBT Grants सह एम. एस. (फार्मा.),एम. फार्मा.,एम. टेक., आणि पीएचडी या उच्च शिक्षणाच्या प्रवेश करिता पात्र ठरले आहेत. संपूर्ण भारतात आमदाबाद, गोहाटी, हाजीपुर, हैदराबाद, कलकत्ता, मोहाली आणि रायबरेली असे एकूण सातच NIPER कॅम्पस असून या ठिकाणी यांचे प्रवेश निश्चित झाले आहे. या मध्ये (NIPER JEE Rank) मानसी गोवर्धन डिडवाणी (97), पारिक कुमार भागवत (640), वैष्णवी पद्मुखे (672), अन्सारी मोहम्मद हनीफ जैनुद्दीन (952), सानिका शांताराम शिंदे (1238), यामिनी देवीचंद्र ढगे (1265) हे विद्यार्थी पात्र झाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चेअरमन श्री. राजशेखर शिवदारे यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेचे विश्वस्त प्रा. बि. व्ही. शेटे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांनी ज्या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे स्थापना केली ती उद्देश आज पूर्ण होत असल्याचे दिसून येते आणि यशाची परंपरा देश पातळीवर कायम राहिली आहे असे नमूद करत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी आणि पालक वर्गातून अभिनंदनचे वर्षाव होत आहे.
Post Views: 14