
सांगोला – जीवनात एकच गुरु करा. त्यांच्यावर निष्ठा, प्रेम ठेवा. अडचणीतून तोच तुम्हाला बाहेर काढणार आहे. म्हणजे गुरु हा जीवन मार्गातील दीपस्तंभ आहे असे कोळेकर महास्वामी ३१ वे पिठाधिपती यांनी कोळेकर महास्वामी ३० वे पिठाधिपती यांच्या द्वितीय पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त कोळे (ता.सांगोला) मठात आशीर्वाचनात सांगितले. यावेळी शिवाचार्य वेळापूरकर महास्वामी उपस्थित होते. याप्रसंगी हनुमंत कोरे व मुक्तापुरे महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. ३० वे पीठाधिपती कोळेकर महाराज यांनी कधीही भेदभाव व जातीभेद केला नाही. सर्वांवर प्रेम केले. त्यांच्यामुळे आज मी कीर्तनात उभा आहे. हा माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे. तसेच गुरुच्या माध्यमातून देवाचे दर्शन होते असे कीर्तनात सचिन कुंभार महाराज यांनी सांगितले. सदर प्रसंगी कोळेकर व वेळापूरकर महास्वामींचे स्वागत तानाजी गोडसे व प्रभू कोरे यांनी केले. महाआरती रामहरी गोडसे व अर्चना गोडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी हर हर महादेव, माऊली..माऊली..गुरुराज माऊली..माझी कोळेकर माऊली नावाने मोठ्याने जयघोष करण्यात आला. यावेळी महिला, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 30