सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाने घरातील छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मनोहरनगर झोपडपट्टी येथे मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
संकेत ज्ञानेश्वर नाईकनवरे (वय 25 वर्ष ,रा.137 बुधवारपेठ, मिलिंद नगर सोलापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह मनोहरनगर झोपडपट्टी येथील अनिता वाल्मिकी धोत्रे यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला . ही खबर फौजदार चावडी पोलिसांना समजली असता पोलीस हवलदार बी.जे. कसबे यांनी घटनास्थळी पोहचून इतरांच्या साहाय्याने गळफास सोडवून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात संध्याकाळी साडेसात वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
Post Views: 38