
अक्कलकोट – राजर्षी शाहू महाराज यांनी दुर्बल, वंचित समाजाच्या उन्नतीसाठी चौफेर कार्य केले, त्यामुळे सामाजिक समता प्रस्थापित झाली. समाजपरिवर्तन देखील जलद गतीने झाले, म्हणून त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन एकसंघ समाजाची निर्मिती केली पाहिजे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी, पर्यवेक्षक सिद्धाराम पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण लागू करून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले. त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद आणि सामाजिक विषमता यांना विरोध केला.स्त्री शिक्षण आणि बालविवाह, अंधश्रद्धा आणि सामाजिक रूढींविरुद्ध जनजागृती केली. महिलांना स्वावलंबनाच्या संधी उपलब्ध करून दिली, शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी उपाययोजना केल्या.म्हणूनच त्यांचे कार्य वंदनीय आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केली सूत्रसंचलन प्रा जनाबाई चौधरी यांनी केले, आभार कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी मानले.
कार्यक्रमास प्रा शितल फुटाणे, प्रा शितल टिंगरे, शिवकुमार मठदेवरु, ऐश्वर्या तारापुरे, प्रा शितल झीगाडे उपस्थित होते.
Post Views: 13