बार्शी – शहर व तालुक्यात बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नगरपालिका तसेच विधान परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल व सत्ता केंद्र ताब्यात दिल्याबद्दल बार्शी शहर व तालुक्यातील मतदारांचे पावसाळी अधिवेशन संपल्यावर प्रत्यक्ष भेट देणार असून त्यांच्या अडीअडचणी तसेच बाजार समिती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व विधान परिषद निवडणुकीत सत्ता केंद्र ताब्यात मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यासाठी शहर व तालुक्यातील मतदारांच्या गाठीभेटी घेणार आहे.
बार्शी तालुक्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मिळाला. तसेच विधान परिषदेचे निवडणुकीतही मला विजय करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे मोठे सहकार्य लाभले आहे. मी आमदार नसल्यामुळे लोकांना विकासकामांविषयी कुठेतरी दुर्लक्ष होईल असे वाटत होते. परंतु श्री भगवंत व आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज आमदार झालो. बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाणी देण्याचा शब्द दिला होता. पण कुर्डूवाडी ते पिंपळनेर दरम्यान नवीन पाईप लाईन रोडच्या मध्ये येत असल्यामुळे त्याचे काम होऊ शकले नाही. परंतु तुम्ही तशीच पाईपलाईन करा म्हणत असाल तर उद्याच करायला सुरुवात करण्यात येईल. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या अडचणीमुळे ते काम शक्य होणार नाही व आपले पैसे फुकट वाया जातील. अक्कलकोट येथे रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्यक्ष भेटलो असता त्यांनी मला या मार्गाची लवकरच विस्तारीकरण काम करणार असा शब्द देऊन राजाभाऊ काळजी करु नका कुठल्याही परिस्थितीमध्ये मी बाराशे कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी उपलब्ध करुन देतो आणि भूसंपादनला २५० कोटी आणि साडेनऊ कोटी रस्त्याच्या कामाला त्यामुळे त्याचीही मंजुरी एक महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आणतोय आणि कुर्डूवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करुन कामाला सुरुवात होईल. नगरपालिका निवडणुकीत आम्ही तुम्हाला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असा शब्द दिला होता त्याबद्दल मी आपली माफी मागतो. तांत्रिक अडचण आल्यामुळे आम्हाला एक वर्षभर आणखीन मुदत द्या, नवीन पाईप लाईन झाल्यावर आपल्याला कायमस्वरुपी रोज पाणी मिळणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आपण नियोजन करताना साधारण पुढच्या ३०-३५ वर्षांचा विचार केलेला आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करुन घेऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्याकडून विकास कामाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये निधी मंजूर होणार आहे. पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर ही माहिती दिली जाईल. शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त पिकविमा कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून व जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल याबाबतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्याबरोबर चर्चा करुन त्याबाबतचा पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानतो व निकाल लागला आमदार झालो की अधिवेशन चालू झाले. सगळ्यांना असं वाटू नये आमचा राजाभाऊ कुठे गेला. साडेतीन महिन्यांपूर्वी श्री तिरुपती दर्शनासाठी बुकिंग केली होते. तिरुपतीला चाललोय नंतर अधिवेशनच आहे तर माझी सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे या अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा व शहरात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व बाजार समितीमध्ये सत्ता आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन दौरा करणार आहे. शासकीय बाजार समिती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनीताई कथले, बाजार समितीचे चेअरमन विजय गरड, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे आदी उपस्थित होते. बार्शी शहर व तालुक्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यासाठी गर्दी झाली होती यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिका सदस्य, बाजार समिती संचालक आदींसह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.