सोलापूर :* बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत वही वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना पाट्यांचेही वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ जवळपास २०० विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुनिल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. विनायक बटगिरी होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. शंकर बटगिरी यांनी प्रास्ताविकातून फाऊंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती देत, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी श्रीमद् वीरशैव कुरुहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे विश्वस्त श्री. नागेश टंकसाल, संस्थेचे माजी सचिव श्री. सत्यनारायण द्यावरकोंडा, नीलकंठेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शामला गवनी, सौ. रेश्मा बोगा, दैनिक कटूसत्त्यच्या सौ. शिल्पा अलमेलकर, तसेच श्री. श्रीनिवास बंदगी, श्री. नरसिंग म्हंता, श्री. रमेश म्हंताटी, श्री. शशिकांत नादरगी, श्री. समर्थ बुगडी, श्री. नितेश पोगुल, श्री. राहुल गड्डम, श्री. लक्ष्मीकांत आडकी, श्री. राजू माचर्ला, श्री. प्रसाद माचर्ला, श्री. कार्तिक चिकनी, श्री. राजू आवाल, श्री. अंबादास दंडगळ, श्री. नवल बटगिरी, श्री. समर्थ मुटकिरी, श्री. रमेश कनकी, श्री. नविन गंजी यांच्यासह अनेक मान्यवर व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत वह्या व प्राथमिक विद्यार्थ्यांना पाट्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी बी. नारायणा फाऊंडेशनचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शंकर बटगिरी यांनी केले, तर श्री. निखिल बटगिरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Post Views: 16