Sunday, June 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवराज्याभिषेक सोहळ्यात मोहन शेटे यांचे प्रतिपादन ; अफजलखान मोहिमेतील मानसशास्त्रीय युद्धनीतीचे केले विश्लेषण

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in solapur
0
शिवराज्याभिषेक सोहळ्यात मोहन शेटे यांचे प्रतिपादन ; अफजलखान मोहिमेतील मानसशास्त्रीय युद्धनीतीचे केले विश्लेषण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पराभव केवळ तलवारीच्या बळावर नव्हे, तर बुद्धिमत्ता, संयम, मानसशास्त्रीय डावपेच आणि दूरदृष्टीच्या आधारे केला. युद्धात शत्रूला पराभूत करण्यापूर्वी त्याच्या मनावर विजय मिळविणे हीच खरी युद्धनीती असल्याचे प्रतिपादन इतिहास अभ्यासक आणि शिवचरित्र व्याख्याते मोहन शेटे यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानात केले.
अफजलखानाच्या स्वभावाचा सखोल अभ्यास करून शिवाजी महाराजांनी त्याच्या लोभ, अहंकार आणि उतावळेपणाचा अचूक उपयोग केला. नजराणे पाठवून त्याच्या मनात लालसा निर्माण केली, स्वतः घाबरल्याचा आभास निर्माण करून त्याचा अहंकार चिथावला आणि तब्बल सहा महिने वेळ काढत त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जावळीच्या प्रतिकूल भौगोलिक प्रदेशात येण्यास भाग पाडले. युद्धभूमी स्वतःस अनुकूल करून शत्रूला तेथे खेचून आणणे, ही जगातील सर्वोच्च युद्धनीती असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
श्री. शेटे म्हणाले, प्रतापगडावरील भेटीपूर्वीच महाराजांनी मानसिक आणि रणनीतिक पातळीवर अर्धे युद्ध जिंकले होते. प्रतापगड आणि महाबळेश्वरच्या डोंगररांगांमधील जावळी ही अफजलखानासाठी सापळा ठरली. त्यामुळे १० नोव्हेंबर १६५९ रोजी झालेली प्रतापगडावरील भेट ही केवळ दोन व्यक्तींमधील संघर्ष नव्हती, तर दोन विचारप्रवाहांचा निर्णायक सामना होता.
ब्रिटिश अधिकारी रिचर्ड टेम्पल यांच्या उल्लेखाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेली घटना ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. महाराजांचा एक क्षणाचा निर्णयही संपूर्ण इतिहास बदलू शकला असता, याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
श्री तुळजाभवानीवरील महाराजांची अखंड श्रद्धा, प्रतापगडावर श्री भवानीमातेची प्रतिष्ठापना आणि धर्मरक्षणासाठी केलेला संघर्ष यावर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ एका राजाचे चरित्र नसून संस्कृती, स्वाभिमान आणि राष्ट्ररक्षणाचा अखंड संदेश आहे.
व्याख्यानाच्या शेवटी त्यांनी युवकांना आवाहन केले की, छत्रपती श्री शिवाजी महाराजांकडून केवळ शौर्य नव्हे, तर नियोजन, संयम, अभ्यास, परिस्थितीचे अचूक विश्लेषण आणि बुद्धीच्या बळावर संकटांवर मात करण्याची प्रेरणा घ्यावी. समाजाने इतिहासाकडे भावनेइतक्याच विवेकाने पाहिले, तरच राष्ट्रनिर्मितीची खरी दिशा मिळेल, असा संदेशही मोहन शेटे यांनी दिला.
Post Views: 10
Previous Post

बी. नारायणा फाऊंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही व पाट्यांचे वाटप

Next Post

हुतात्मा स्मृती मंदिरात जिवंत झाला प्रतापगड पर्वाचा इतिहास

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हुतात्मा स्मृती मंदिरात जिवंत झाला प्रतापगड पर्वाचा इतिहास

हुतात्मा स्मृती मंदिरात जिवंत झाला प्रतापगड पर्वाचा इतिहास

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेत राज्यात पहिल्यांदाच अबॅकस शिक्षणाची सुरुवात

जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेत राज्यात पहिल्यांदाच अबॅकस शिक्षणाची सुरुवात

June 28, 2026
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण

June 28, 2026
स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, अळणी येथे सेवा उपक्रम

स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, अळणी येथे सेवा उपक्रम

June 28, 2026

विजेचा शॉक लागून एकाचा जागेवर मृत्यू

June 28, 2026
‘वॉरियर्स’ व ‘थंडर्स क्वीन्स’ संघांची विजयी सलामी

‘वॉरियर्स’ व ‘थंडर्स क्वीन्स’ संघांची विजयी सलामी

June 28, 2026

अवंती नगर, अरविंद धाम परिसरात विजेचा लपंडाव

June 28, 2026
स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

June 28, 2026
वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

वाखरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0945604

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697