सोलापूर – बायडिंग तार वरील कपडे काढत असताना विजेचा जोराचा शॉक लागू नये का पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे आज रविवारी सकाळी सात वाजता घडली .
सुदाम तुकाराम माने ( वय 50 वर्ष , रा. बीबी दारफळ ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव असून ते आज रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घरात आंघोळ करून ते घराला लागून असलेल्या वाइंडिंग तार वरील कपडे काढत होते . त्यावेळी त्यांच्या उजव्या हाताला विजेचा जोरदार धक्का बसला .तेव्हा ते तारेला जागेवर चिटकले . ही घटना पाहताच मुलगा जयंत याने वडिलांना वाचविण्यासाठी लाकडाने ओढले असता ते खाली पडले . त्यांना मुलाने त्वरित उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात सकाळी साडेआठ वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .






















