सांगोला – जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पेरणीसाठी प्रतीक्षेत असलेल्या सांगोला व परिसरातील शेतकऱ्यांना सोमवार दि.२९ जून रोजी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच या पावसामुळे उन्हाच्या आणि उकाड्याच्या त्रासापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग येणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या पावसामुळे सांगोला परिसरातील निसर्गाला नवीन संजीवनी मिळाली असून नागरिकांमधून आनंद व्यक्त होत आहे. सदर पावसामुळे ऊस, डाळिंब, मका या पिकांना फायदा झाला असून सूर्यफूल व बाजरी या पिकांची पेरणी करण्यासाठी पेरणीयोग्य पाऊस झाली असल्याची प्रतिक्रिया सांगोला शहरातील गावडे वस्ती येथील प्रगतशील शेतकरी सुनील प्रकाश गावडे यांनी दिली.
Post Views: 14