पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील मौजे भाळवणी येथील विवाहित स्त्रीच्या घरात बळजबरीने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी बिभीशण पाटील व गोरख पाटील रा.भाळवणी यांना मंगळवेढा येथील न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३५४,४५२,३२३,३४ करिता दोषी धरून एक वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा व द्रव्य दंडाची शिक्षा सुनावलेली होती.
या शिक्षेबाबत आरोपीने पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केलेले होते. सदर अपीलाचे कामी ओंकार देशमुख अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पंढरपूर यांनी अपील नामंजूर करून खालील न्यायालयात झालेली शिक्षा कायम केली.
यात अपिलदार आरोपी पक्षाने असा युक्तिवाद करण्यात आला की, आरोपींना खोटेपणाने केस मध्ये गुंतवण्यात आलेले आहे पीडित व तिचे पती बेकायदेशीर रित्या इलेक्ट्रिक कनेक्शन घेत होते त्याला आरोपींच्या विरोध होता त्यामुळे पीडित व तिचे पती आरोपींवर चिडून होते व घटने दिवशी आरोपी एका मयताच्या अंत्यविधी करता गेलेले असल्यामुळे ते घटनास्थळी हजर नव्हते त्यामुळे घटनेच्या आरोपींचा संबंध नाही. त्यांना खोटे गुन्ह्यात गुंतवण्यात आलेली आहे त्यामुळे झालेली शिक्षा रद्दबातल करण्याबाबत युक्तिवाद करण्यात आला.
त्यानुसार अति. जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवेढा न्यायालयात पीडित महिला व साक्षीदार यांचा झालेले एकंदरीत पुराव्याचे अवलोकन करून आरोपींचे अपील नामंजूर करून मंगळवेढा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांनी भारतीय दंड संहिता कलम ३५४,४५२,३२३,३४ नुसार दिलेले शिक्षा अपिलात कायम केली. या सरकार पक्षातर्फे सारंग वांगीकर यांनी कामकाज चालवले तर मंगळवेढा पोलीस स्टेशन तर्फे कोर्ट पैरवी म्हणून एम. आर. मुलाणी कार्यरत होते.
————————
चौकट : सदर अपिलात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आला व घटना पीडितेच्या घरामध्ये घडलेली आहे व तिने याची खबर व फिर्याद लगेच पोलिसांना दिलेली आहे व त्याकरता कोणताही विलंब झालेला नाही तसेच पीडितेचे साक्षी दरम्यान कोणतीही विसंगती आरोपी पक्षाने न्यायालयासमोर आणलेलं नाहीत तसेच पीडित व तिचे पती बेकायदेशी रित्या विजेचे कनेक्शन घेत होते याबाबत देखील बाब न्यायालयासमोर आलेले नाही व घटने दिवशी आरोपी एका मयताच्या अंतविधीला गेले होते याबाबत त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला कोणताही बचाव साक्षीदार आरोपीनी नोंदवलेला नाही आरोपींना खोटेपणाने या केस मध्ये गुंतवण्याचे कोणतेही कारण न्यायालयाचे अभिलेखावर आलेले नाही या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या व सदरचे अपील नामंजूर करण्याबाबत युक्तिवाद करण्यात आला.
Post Views: 13