सोलापूर – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळे याला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने फाशी सुनावल्या नंतर, ” आज खऱ्या अर्थाने आमच्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली आहे “अशी प्रतिक्रिया सोलापुरात वाव संघटनेच्या अध्यक्ष विद्या लोलगे यांनी दिली आहे.
ती चिमुकली सोलापूरची नात होती, त्या नराधमाला फाशीची शिक्षा 55 दिवसांत जाहीर करण्यात आली, त्याचप्रमाणे लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली . शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंके यांनी ‘आता फासावर चढा’ असे शब्द भीमरावला उद्देशून काढले. चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे.
या वेळी विद्या लोलगे, मदिना पटेल, पुष्पा हलकुडे, शारदा मसुदी, अफ्रिन पटेल, उषा नरले, अर्चना आवlर, अनुजा उमाटे आदी महिला उपस्थित होत्या



















