सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 34 वर्षीय टॉवेल कारखानदाराने घरातील छताच्या पंख्याला साडी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पद्म नगर येथील राधाकृष्ण एव्हीन्यू अपार्टमेंट मध्ये आज बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली .
शिवकुमार चंद्रकांत श्रीराम ( वय 34 वर्ष , रा. राधाकृष्ण एव्हीन्यू अपार्टमेंट, 6 वा मजला, पद्मनगर , कर्णिक नगर जवळ सोलापूर ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे . त्यांचा एमआयडीसी मध्ये श्रीराम टॉवेल कारखानदारीचा व्यवसाय आहे . रविवार 28 जून रोजी शिवकुमार यांचे आई वडील हे मुलीला भेटण्यासाठी मुंबईला गेले होते . शिवकुमार हा घरी एकटाच असताना त्याने अज्ञात कारणावरून अज्ञात वेळी घरामध्ये स्वतःला गळफास लावून घेतला .
दरम्यान आज सकाळी शिवकुमार चे वडील हे शिवकुमारला वारंवार फोन लावत होते. मात्र तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घराच्या जवळ राहणाऱ्या आपल्या भावाला फोन करून ही कल्पना देऊन घराकडे जाण्यास सांगितले .त्याप्रमाणे ते शिवकुमारला पाहण्यासाठी घराकडे आले असता त्यांना घराजवळ दुर्गंधी येऊ लागली . दरवाजावर आवाज दिला मात्र आतून काही प्रतिसाद मिळत नव्हता.शंका आल्याने त्यांनी इतर नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर ही खबर एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलीस हवालदार डि.के. डोके यांनी घटनास्थळी पोहचून दरवाजा उचकटून नातेवाईकांसह घरात प्रवेश केला असता शिवकुमार हा छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याचा चेहरा व शरीर पूर्ण फुगल्याने शरीरातील रक्त खाली पडल्याने फरश्या रक्ताने माखल्या गेल्या होत्या. घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दुपारी एक वाजता दाखल केला .
चौकट –
मयत शिवकुमार हा अविवाहित असून तो आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. शिवकुमार व त्याच्या वडिलांचे सोमवार रोजी मोबाईलवर बोलणे झाले होते. तसेच शिवकुमार च्या चुलत भावाने शिवकुमारला सोमवारी दुपारी त्याच्या मित्रासोबत फिरताना पाहिले होते. मयत शिवकुमार च्या पश्चात आई वडील व बहीण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
Post Views: 25