सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यू.कॉलेज येथे शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ प्रवेश प्रक्रियेनुसार दि.१ जुलै रोजी इ.११ वी कला, वाणिज्य व शास्त्र शाखेच्या वर्गाची सुरूवात झाली. याप्रसंगी नवागत विद्यार्थ्यांचे व पालकांचे प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे यांचे हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सुरुवातीला गुरुवर्य कै.बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास विद्यार्थी व पालक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके यांनी शुभेच्छा दिल्या.