सांगोला – तालुका गणित अध्यापक मंडळाच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेत विद्यालयात गणित विषयात प्रथम, गणित प्रज्ञा आणि पारंगत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षक तसेच पदोन्नती मिळालेल्या तालुक्यातील गणित शिक्षकांचा सत्कार समारंभ रविवार दि.५ जुलै रोजी स.१०.३० वा. सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे आयोजित केला आहे. डॉ.अनिकेत देशमुख, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संजय भस्मे, मुख्याध्यापक चारुदत्त जगताप यांचे शुभहस्ते सदर कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलकंठ लिंगे, शिवाजीराव चौगुले, आनंद खंडागळे, दिलावर नदाफ, अण्णासाहेब गायकवाड, दिनेश सुरवसे, वैशाली बेहरे, एकनाथ फाटे, शरद धोकटे परिश्रम घेत आहेत.