सांगोला – लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या वतीने राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रगतशील बागायतदार बाबुरावजी गायकवाड, सी.ए दिनानिमित्त सी.ए.उत्तम बनकर व डॉक्टर्स दिनानिमित्त डॉ.शैलेश डोंबे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रम आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे प्रांतपाल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली नगर वाचनमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे संपन्न झाला. मनोगतात बाबुरावजी गायकवाड यांनी शेतीविषयी आपले अनुभव कथन केले. सी.ए उत्तम बनकर व डॉ.शैलेश डोंबे यांनी समाजसेवा व व्यावसायिक नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित केले. याप्रसंगी प्रा.प्रसाद खडतरे, खजिनदार प्रा.निलेश नागणे, अमर गुळमिरे, मिलिंद फाळके, शुभांगी घोंगडे, प्रा.शिवशंकर तटाळे, प्रा.डी.के.पाटील, इसाक मुल्ला, तानसिंग माळी, प्रा.गणेश पैलवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला क्लबचे अध्यक्ष प्रशांत रायचुरे, सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र कुंभार यांनी केले. आभार प्रा.नवनाथ बंडगर यांनी मानले केले.
Post Views: 14