अक्कलकोट – पर्यावरण संतुलन बिघडत आहे . कुठे अनावृष्ठी कुठे अतिवृष्ठी होत आहे . पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे . हैद्रा देवस्थान व वसंत देडे मित्रपरिवाराने वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन पर्यावरण रक्षणाकरिता मोलाचे कार्य करीत असल्याचे गोरवोद्गार विभागीय पोलीस अधिकारी राजेद्र टाकणे यांनी काढले .
हजरत ख्वाजा हाजी सैफुल मुल्क चिश्ती कादरी रह . हैद्रा देवस्थान ट्रस्ट व भारतीय लहुजी सेना जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांच्या संयुक्त विद्यमाने हैद्रा देवस्थान ट्रस्ट येथे वृक्षारोपण करण्यात आले . याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी राजेद्र टाकणे बोलत होते .
महापारेषाण उपकार्यकारी अभियंता अक्कलकोट १चे आर एच आडम ‘, उपकार्यकारी अभियंता अक्कलकोट क्रमांक २चे श्रीनिवास पाडाल ‘ हैद्रा सरपंच नागव्वा पिरप्पा तेली’ माजी सरपंच मलकणा कोगनुर, ; दर्गाह चेअरमन- रफीक मुजावर, व्हा. चेरममन – बंदानवाज मुजावर ‘ भारतीय लहुजी सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे तालुकाध्यक्ष लखन वाघमारे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती .
चौकट > पर्यावरण संरक्षण वृक्ष लागवड ‘ संरक्षण याकडे दुर्लक्ष याचे पुरागामी परिणाम > वसंत देडे
पर्यावरणाचा मोठया प्रमाणात ऱ्हास व .जमीनीची मोठया प्रमाणात धुप होत आहे . तापमान वाढत आहे .े वेळीच सावध होणे वसुधंरा वाचविणे गरज आहे याकरिता वृक्ष लागवड ही चळवळ बनणे गरज आहे पण याबाबत फार मोठी अनास्था आहे अशी खंत जिल्हा अध्यक्ष वसंत देडे यांनी व्यक्तत केली .
याप्रसंगी पोलीस पाटील श्रीशैल कोगनुर , विश्र्वनाथ कोगनुर ;श्रीमंत रुग्गी , संगप्पा पाटील , विद्याधर पाटील , डॉ मुजावर , जिलानी मुजावर , बुडन मुजावर उपस्थित होते ..या शंभर वृक्ष रोपणसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, मनसे अक्कलकोट शहर संघटक बारकू शिंदे अनिल झंपले तालुका अध्यक्ष भारतीय लहुजी सेना, लखन वाघमारे’ हैद्रा देवस्थानचे विश्वस्त कर्मचारी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले .
Post Views: 12