सांगोला – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सचिन आहीर यांचा माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सत्कार केला. सचिन आहीर यांचा राजकीय अनुभव, प्रशासनाचा अभ्यास आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपद्धती राज्याच्या संसदीय कामकाजाला निश्चितच बळ देणारी ठरेल त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, दीन दलीत आणि अल्पसंख्यांक वर्गाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास यावेळी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना नूतन उपसभापती सचिन आहीर यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांचे आभार मानत राज्याच्या हिताला प्राधान्य देत, सभागृहाची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी निष्पक्षपणे आणि जबाबदारीने काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
Post Views: 8