पिलीव – सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण पर्यटनाला चालना देणे,स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करणे आणि जिल्ह्याच्या पर्यटन क्षमतेचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागात कृषी पर्यटन केंद्रे उभारण्यात येत आहेत. याच योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे कृषी पर्यटन केंद्र मंजूर झाले आहे. राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्या विशेष व सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे केंद्र मंजूर झाल्याची माहिती पंचायत समिती सदस्या सौ. नम्रता शिवराज पुकळे यांनी दिली.
या पर्यटन केंद्रामुळे पर्यटकांना ग्रामीण भागातील अस्सल जीवनशैलीचा अनुभव घेता येणार आहे. विविध विशेष घटकांवर आधारित पर्यटन गावे आणि कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून पर्यटकांना खालील गोष्टी जवळून अनुभवण्याची संधी मिळेल.
पिलीव हे गाव पंढरपूर-सातारा या मुख्य मार्गावरील एक प्रमुख आणि मध्यवर्ती गाव आहे. या गावाशी आसपासच्या ६ ते ७ गावांचा रोजचा थेट संपर्क येतो. तसेच, पिलीव येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री महालक्ष्मी मंदिर आहे आणि गावाजवळच निसर्गरम्य तलावही आहे. धार्मिक आणि नैसर्गिक अशा दोन्ही बाजू अनुकूल असल्याने येथे पर्यटनाला प्रचंड मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
चौकट
सक्रिय सहभागाचे आवाहन
”शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे पिलीव आणि परिसरातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार असून तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. पिलीव मधील नागरिक, ग्रामस्थ, शेतकरी तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी सहकार्य करावे.”
— सौ. नम्रता शिवराज पुकळे (सदस्या, पंचायत समिती)
Post Views: 5