
सोलापूर – वरिष्ठांच्या पाचव्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत 30 वर्षावरील पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या प्रथम मानांकित जगन्मय पाणिग्रही ने सोलापूरच्या बिगर मानांकित उमेश बडगेरचा अत्यंत अतीतटीच्या टायब्रेक लढतीत 6-2, 3-6, 11-09 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, 65 वर्षांवरील पुरुष गटात सोलापूरच्या राजीव देसाई,अरुण अगरवाल यांनी आगेकूच केली.
सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल आणि इलिझियम क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत 45 वर्षांवरील पुरुष गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित नरेंद्र सिंग चौधरी याने बोसकिरण नल्लामोठु यांचा 6-2, 6-1 असा तर, तिसऱ्या मानांकित
संदीप बेडेकरने दुसऱ्या मानांकित नितेश रुंगताचा 6-4, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

60 वर्षांवरील पुरुष गटात सोलापूरच्या राजीव देसाईने छत्रपती संभाजीनगरच्या गोपाल देववर 6-0, 6-0 असा एकतर्फी विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात अरुण अगरवाल याने अमित सांगलवर 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
आजचे निकाल: 75 वर्षांवरील पुरुष:
रामकृष्ण सुदगणी (भारत) वि.वि.शिवामोनी मूर्ती (भारत) 6-2, 6-2; आर गंगाधरण (भारत) वि.वि.राजेंद्र अगरवाल [4] (भारत) 6-2, 6-3; शैलेंद्र खंडेलवाल (भारत) वि.वि.दर्शन मारिया (भारत) 6-3, 5-7, 10-1; हरीश कुमार (भारत) वि.वि. नुन्ना कुमार (भारत) 6-4, 3-6, 10-5; ताहीर अली (भारत) वि.वि.विजय शर्मा (भारत) 6-0, 6-0; गोविंद कुमार (भारत) वि.वि.मुकेश बजाज (भारत) 6-1, 6-2.



















