सोलापूर – भंडारकवठे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून प्रवीण बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष मुकेश व्हनकोरे यांनी अध्यक्षपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपताच राजीनामा दिला होता. यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदावर बिराजदार यांची निवड झाली.
सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांच्या गटाची सत्ता आल्यानंतर दरवर्षी सोसायटीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर सर्वांना संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पाचवे अध्यक्ष म्हणून बिराजदार यांना संधी दिली आहे. यावेळी माजी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर, महादेव बगले, मावळते अध्यक्ष मुकेश व्हनकोरे, महादेव हत्ताळे, इरप्पा कोरे, आमसिध्द बुधाळे, कमलाबाई मुक्काणे, बाळासाहेब मैंदर्गी, राजेश्री पाटील, आमसिध्द घोडके, पुत्रप्पा बबलेश्वर शिरीष शहा आदी संचालकांसह हणमंत पुजारी, मायप्पा जंगलगी, बसवराज मुक्काणे, यतीन शहा, अशोक मुक्काणे, आमसिध्द मुक्काणे, सुरेश धुरपे, गोपाल बनपूरे, सोमनाथ भरले, विनायक कमळे, सोमनिंग कमळे, राजकुमार बिजर्गी, महादेव लायाणे, अनिल पाटील, धरेप्पा तेली उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद सुरवसे, सुनील माने व सहाय्यक म्हणून सचिव सिद्धाराम बिराजदार यांनी काम पाहिले.
….
चौकट
…
पॅनल प्रमुख भीमाशंकर बबलेश्वर आणि सर्व संचालकांनी मिळून माझ्यावर विश्वास दाखवत पाच कोटी होऊन अधिक उलाढाल असलेल्या मोठ्या सोसायटीच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे. या काळात शेतकर्यांच्या हिताचे निर्णय घेताना सर्व संचालकांना विश्वासात घेऊन सोसायटीचा कारभार करणार आहे .
Post Views: 11