पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जिल्ह्य परिषद केंद्र शाळेतील पाचवीचे सात विद्यार्थी 2025_26 मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीधारक ठरले .यामध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी चि.हर्ष सुहास कोल्हे २५०/३०० गुण,कु.आदिती अमोल ठेंगल २५०/३०० गुण,चि.विराज अंबादास गुजरे२४०/३००,चि.विघ्नेश विनोद तावरे २३८/३००,कु. ईश्वरी नितीन मगर२३४/३००, सार्थक युवराज नरुटे २२८/३००कु.प्रणाली विजय लोखंडे २२२/३०० या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती सुप्रिया विजयकुमार पांगे – देशमुख मॅडम यांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचेही मार्गदर्शन लाभले.या विद्यार्थ्यांचे माळशिरस तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी मॅडम, केंद्रप्रमुख श्री.राजकुमार फासे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री.राजू गोरवे सर तसेच सर्व शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल गांधी, उपाध्यक्ष प्रियंका रजपूत व सर्व सदस्य,पालक व ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
Post Views: 12