जेऊर – केम (ता. करमाळा) येथे प्रहार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेना विधानपरिषद आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त केम येथील सामाजिक युवा ग्रामस्थ व प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांच्या वतीने श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा संचलित श्री नागनाथ मतिमंद निवासी विद्यालय, केम येथे सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए.पी. ग्रुपचे संस्थापक मा. अच्युत (काका) पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. सागर दौंड, महावीर आबा तळेकर चेअरमन आनंद शिंदे, तसेच प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष मा. संदीप तळेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर चव्हाण सर यांनी आमदार बच्चुभाऊ कडू साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जाधव मॅडम यांनी शुभेच्छा व्यक्त करत विद्यालयाच्या कार्याची व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष मा. संदीप तळेकर यांनी आमदार बच्चुभाऊ कडू साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, “बच्चुभाऊ कडू यांनी आयुष्यभर समाजातील वंचित, शेतकरी, दिव्यांग आणि गरजू घटकांसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हीही समाजसेवेचे व्रत जपत आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले असून, भविष्यात शाळेला किंवा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची गरज भासल्यास प्रहार संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन चव्हाण सर यांनी मानले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नाळे सर, आदेश सपकाळ, प्रथमेश पवार, विद्यालयाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसरपंच सागर कुरडे, योगेश ओहोळ, सचिन तळेकर, , बापू नेते तळेकर, भारत नागणे, सुनील चव्हाण, राजेंद्र देवकर, सागर गायकवाड, भाजप सरचिटणीस धनंजय ताकमोगे, केळी व्यापारी गीते साहेब तसेच केम गावातील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमामुळे आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करून अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Post Views: 13