माळशिरस – माळशिरस म्हसवड रस्त्यावर मेन कॅनॉल नजीक अध्यक्ष ढाब्यासमोर मोटार सायकलस्वार व पिकअपच्या अपघातात मोटार सायकल चालक रमेश शिवाजी शिंदे (वय ५२ वर्षे ) रा.भांबुर्डी ता.माळशिरस हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारासाठी माळशिरस येथे हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

माळशिरस कडून म्हसवडकडे चाललेल्या पिकअपची व समोरून येणाऱ्या मोटर सायकलची जोरात धडक झाली. यात मोटार सायकल चालक रमेश शिंदे गंभीर जखमी झाला .त्यास उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले होते.परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.याबाबत पोलिसात अज्ञात वाहना विरोधात गुन्हा दाखल झाला असून.सदर घटनेचा पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मसाजी थोरात अधिक तपास करीत आहेत.
फोटो..मयत रमेश शिंदे
Post Views: 15