सोलापूर – येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे दिनांक ५ जुलै २०२६ रोजी जिल्हास्तरीय कायदेविषयक परिषदेचे दिमाखात आयोजन करण्यात आले होते. या उच्चस्तरीय परिषदेचे अध्यक्षपद भारताचे ५२ वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भूषवले.या परिषदेला मुंबई उच्च न्यायालयाचे सन्माननीय न्यायाधीश, सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश महोदय आणि विधी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने या सोहळ्याची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

सरन्यायाधीशांचा विशेष सत्कारपरिषेदेचे कार्यकारिणी सदस्य ॲड. संजयजी गायकवाड यांच्या हस्ते भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला. विधी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल या वेळी मान्यवरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे आभार मानले.वकिलांच्या भूमिकेवर महत्त्वपूर्ण मांडणीया परिषदेत बोलताना कार्यकारिणी सदस्य ॲड. संजय गायकवाड यांनी न्यायदानाच्या प्रक्रियेत ‘वकिलांची भूमिका’ या विषयावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि न्यायव्यवस्थेचा कणा म्हणून वकिलांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. बदलत्या काळातील कायदेशीर आव्हाने आणि वकिलांचे कर्तव्य यावर त्यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
या कायदेविषयक परिषदेमुळे सोलापूर जिल्ह्यातील वकील आणि विधी क्षेत्रातील अभ्यासकांना सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे थेट मार्गदर्शन लाभले. परिषदेचे आयोजन अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले असून, विधी वर्तुळातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
Post Views: 12