सोलापूर – सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नान्नज येथील खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वसंत साखरे यांच्यासह सहा जणांना सोलापूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी जामीन मंजूर केला.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. १६ जुलै २०२६ रोजी रात्री नान्नज येथे अक्षय भोसले व इतर सहा जणांवर वसंत साखरे यांच्यासह ११ जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्रांनी हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात तपासादरम्यान पोलिसांनी सहभागाच्या आरोपावरून वसंत साखरे यांच्यासह ११ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत असताना आरोपींच्यावतीने ॲड. नागेश मेंडगुदले यांनी जामिनासाठी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मांडण्यात आलेले मुद्दे ग्राह्य धरून वसंत साखरे यांच्यासह सहा आरोपींना जामीन मंजूर केला.
या प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. नागेश मेंडगुदले व ॲड. जगदीश हेळकर यांनी काम पाहिले.
Post Views: 11