Monday, September 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झेडपीच्या औषध भांडारातील नियुक्तीवर संशयाचे सावट

तरुण भारतbyतरुण भारत
July 11, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील मुख्य औषध भांडाराच्या फार्मासिस्ट नियुक्तीवरून नवा वाद निर्माण झाला आहे. संबंधित नियुक्तीसाठी विभागीय आयुक्तांना चुकीची माहिती व प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप होत असून, या नियुक्ती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे, संबंधित फार्मासिस्टने अधिकृत पदभार स्वीकारण्यापूर्वीच आषाढी वारीसाठी सुमारे १० कोटी रुपयांच्या औषध खरेदी प्रक्रियेत सहभाग घेतल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली आहे.
            जिल्हा परिषदेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य औषध भांडारात प्रमुख फार्मासिस्ट पद रिक्त झाल्यानंतर लीना पुजारी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीसाठी आवश्यक अनुभव आणि बदलीसंदर्भातील अटी पूर्ण नसतानाही प्रशासनाने अनुकूल प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला जात आहे. यासाठी जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीच्या शिफारशीचा आधार घेण्यात आल्याचीही चर्चा आहे.
             आरोपानुसार, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित फार्मासिस्टला मुख्य औषध भांडाराचा अनुभव असल्याचे आणि बदलीसाठी आवश्यक अटी पूर्ण असल्याचे प्रमाणित केले. त्यानंतर प्रशासन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांनिशी हा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आणि त्यास मंजुरी मिळाली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी मुख्य औषध भांडारात काम केले नसल्याचा दावा करण्यात येत असल्याने या प्रमाणपत्राच्या सत्यतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
      याचबरोबर, मुख्य औषध भांडारात अनुभवी सहाय्यक फार्मासिस्ट उपलब्ध असताना नव्याने नियुक्ती करण्याची गरज काय होती, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या प्रकरणामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील नियुक्ती प्रक्रिया आणि प्रशासकीय निर्णयांबाबत पारदर्शकतेची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित फार्मासिस्ट लीना पुजारी यांनी घेरडी, वळसंग आणि अनगर येथे सेवा बजावल्याचे मान्य केले असून, मुख्य औषध भांडाराचा अधिकृत पदभार मिळाला नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच काळात आषाढी वारीसाठी औषध खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याची चर्चा प्रशासनात रंगली आहे.
कोट
फार्मासिस्ट नियुक्ती ही पूर्वीच्या कालावधीतील असून विभागीय आयुक्तांच्या स्तरावरील निर्णय असल्याने भाष्य करणे उचित नसल्याचे सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड यांनी सांगितले.
कोट
या प्रकरणाची माध्यमांतून चर्चा सुरू झाल्यानंतर गंभीर दखल घेतली आहे. नियुक्ती प्रक्रियेतील सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी स्पष्ट केले.
कोट
मी यापूर्वी घेरडी, वळसंग व अनगर प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा केली आहे. औषध भांडार येथे वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी पदावर माझी नियुक्ती नियमानुसार झाली आहे. विभागीय आयुक्तांनी माझ्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत. वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी पदावर असलेले सोळंकी हे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी मी या ठिकाणी काम करू नये, यासाठी गेली साडेसहा महिने मता पदभार दिला नाही.
– लीना पुजारी, औषध निर्माण अधिकारी
कोट
लीना पुजारी यांनी आरोग्य केंद्रावर औषध निर्माण अधिकारी पदावर काम करत असताना जिल्हा औषध भांडार येथे भांडारपाल पदाचा कार्यभार सांभाळल्याचे सांगून वरिष्ठांची दिशाभूल केली आहे. शिवाय ज्येष्ठता यादीत माझा २५ वा क्रमांक असताना ३६ व्या क्रमांकावरीत पुजारी यांना कशी नियुक्ती मिळू शकते? यामुळे पुजारी यांची वरिष्ठ औषध निर्माण अधिकारी पदावरील नियुक्ती चुकीच्या पद्धतीने झाली आहे.
– प्रवीण नडगिडे, औषध निर्माण अधिकारी
Post Views: 84
Previous Post

रोटरी क्लब ऑफ सोलापूरतर्फे मंगळवारी ‘पीडीजी के. भोगिशयाना स्मृती व्याख्यान’

Next Post

पिसेवाडीत कृषीकन्यांकडून मोफत लंपी लसीकरण मोहीम यशस्वी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पिसेवाडीत कृषीकन्यांकडून मोफत लंपी लसीकरण मोहीम यशस्वी

पिसेवाडीत कृषीकन्यांकडून मोफत लंपी लसीकरण मोहीम यशस्वी

ताज्या बातम्या

फोनवर बोलण्यास आणि भेटण्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला घरात घुसून मारहाण –   तीन महिलांवर गुन्हा दाखल

September 6, 2026

कॉलेजचे वर्ष वाया गेल्याच्या रागात विवाहित तरुणीने पिले फरशी पुसण्याचे फिनाइल  

September 6, 2026

प्रस्तावित कृष्णा खोरे योजनेतून बार्शी तालुक्यासाठी ५ टीएमसी पाण्याची शिफारस  -कार्यकारी संचालक धुमाळ 

September 6, 2026

माजी मंत्री विजय दादा मोहिते पाटलांची सपत्नीक अनोखी सवारी #marathinews #news

September 6, 2026

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1170462

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!