सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घरफोडीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत दोन सराईत चोरट्यांना अटक केली. आरोपींकडून २८.४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३६५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २५ हजार रुपये रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली सुमारे १ लाख रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण ६ लाख ३ हजार १५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
जिबरान उर्फ शोएब युनूस शेख (वय-२१ वर्षे, रा. बसवेश्वरनगर जवळ, भिमाशंकर नगर, नई जिंदगी सोलापूर ) व प्रशांत नागेश खंदारे (वय १९ वर्षे, रा. केशव नगर इ गो. पटटी, मौलाली चौक, सोलापूर ) अशी अटक करण्यात आलेल्या त्या चोरट्यांची नावे आहेत .
फिर्यादी गोरीशंकर नागनाथ कोळी (वय ५५, रा. यशोधर नगर, नई जिंदगी, सोलापूर) हे सात जुलै रोजी पहाटे आपल्या शेजारच्या दुसऱ्या घरात कुटुंबीयासह झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व २५ हजार रुपये रोख असा एकूण ५ लाख ३ हजार १५८ रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार , पोनि गुन्हे संगीता पाटील , गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकातील अंमलदार, यांनी गुन्हयाचे घटनास्थळास भेट दिली. घटनास्थळाचे परिसरात मिळालेले सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळविण्याचा काम तात्काळ सुरु केले होते. दि. ८ जुलै रोजी पोसई अल्फाज शेख यांचे पथकातील पोलीस अंमलदार अमर शिवशिंगवाले व पोकॉ. नागेशसिंह चव्हाण यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी बसवारुठ मठ, शांतीनगर जवळ सापळा लावून वरील दोघा आरोपींना मोटार सायकलसह ताब्यात घेतले .चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यामुळे घरफोडीचा हा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त प्रितम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब बिराजदार व पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख फौजदार अल्फाज शेख, पोलीस अंमलदार, एकनाथ उबाळे, संदीप जावळे, संचिन भांगे, मंगेश गायकवाड, आमसिध्द निंबाळ, अय्याज बागलकोटे, सुहास अर्जुन, अमर शिवशिंगवाले, नागेशसिंह चव्हाण, कुमार बोल्ली, अजित माने, सकलेन मुकादम, अविनाश दिघोळे यांनी पार पाडली आहे.
Post Views: 31