सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूल मध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक सहविचार सभा संपन्न झाली. या सभेत शाळा व्यवस्थापन समिती, माता पालिका समिती व विविध समित्यांचे स्थापन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व सर्व समिती सदस्यांचे सत्कार करण्यात आले.यावेळी प्रशालेतील श्री नितीन नायब यांनी विद्यार्थ्यांचे शिस्त संस्कार याविषयी तर श्री अतुल जानापुरे यांनी स्कॉलरशिप परीक्षा इतर स्पर्धा परीक्षा तसेच श्री रितेश मेहता यांनी प्रशालेतील ज्यादा तास, विद्यार्थी उपस्थिती व अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले .पालक सौ. स्वाती जानराव यांनी प्रशालेत च्या यशाचे कौतुक केले प्रशालेचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड यांनी प्रशालेतील विविध उपक्रम कार्यक्रमाविषयी व प्रशालेस मिळालेल्या यशाचे माहिती उपस्थित पालकांना सांगितले. या पालक शिक्षक सहविचार सभेस मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.यावेळी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक श्री सुधीर दुर्गे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बगले एस . एम.तर आभार श्रीमती शिंदे एस . एस.यांनी मानले.