अकलूज – स्पोर्टस क्लब व मनशक्ती केंद्र व शिवगर्जना ग्रुप अकलूज यांच्या सौजन्याने अकलूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर २ या शाळेत २०० पानी ३४ डझन वहयांचे वितरण अकलूज नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते- पाटील,सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब अडगळे,अकलूज केंद्राचे केंद्रप्रमुख सुरज कांबळे यांच्या हस्ते शाळेस वहयांचे वाटप करण्यात आले.शिक्षण प्रेमी अण्णासाहेब खडके,गणेश खडके,सोहम खडके,तुषार पालखे,रणवीर खडके यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेत गुढी पाडवा पट वाढवा,शाळा पूर्वतयारी, मूल्यवर्धन कार्यक्रम,क्रीडा स्पर्धा, मुलांचे वाढदिवस,दिनांकानुसार पाढा,वृक्षारोपण कार्यक्रम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.शाळेतील गरिबांची मुले व त्या मुलांची गरज ओळखून या शिक्षणप्रेमींनी मुलांना वहयांचे वाटप केले.या कार्यक्रमाला तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी व विस्ताराधिकारी भक्ती नाचणे यांचे मार्गदर्शन लाभले.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सुकुमारी अंगुले, मनीषा बळवंतराव,तय्यब शेख,अंजली अडाणे,फातिमा मुलाणी व हजराबी बांगी यावेळी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय गायकवाड यांनी केले.व कार्यक्रमाचे आभार श्रीकांत राऊत यांनी मानले.