पंढरपूर – आषाढीयात्रे मध्ये ढोलकी विकुन चार पैसे मिळविण्यासाठी खास उत्तरप्रदेशातून काही कारागीर मंडळी येथे दाखल झालेली आहेत. पंढरपूरात खास यात्रे मध्ये ढोलक्यांची विक्री करण्यासाठी ही मंडळी येथे आलेली आहेत.
येथील आषाढी यात्रेच्या काळात वारकऱ्यांकडून भजन,कीर्तनासाठीविविध प्रकारच्या वाद्यांना चांगलीच मागणी असते त्यामुळे आम्ही गेल्या चार,वर्षापासूनयेथे येत आहोत. भारतामध्ये बऱ्याच राज्यातून आम्ही यात्रांच्या काळात आमची ढोलकी विकलेली आहेत असे या कारागीर मंडळींकडून सांगण्यात आले.
शहराच्य ाविविध भागामधून खास यात्रेसाठी वास्तव्यास असलेली ही मंडळी सध्या ढोलकी तयार करण्याचे काम करीत आहेत. लाकडाच्या ऐवजी खास प्रकारच्या पुठ्या पासून ही ढोलकी बनविली जातात. ही ढोलकी वजनाला हलकी असल्याने अगदी लहानमुलांना देखील ते गळ्यात आडकावून वाजविता येतात. सुमारे २५०, ३००रुपयांपासून ते ५०० ते ६०० रुपयांपर्यंतची विविध आकारातील आणि रंगातील ढोलकी विक्रीस उपलब्ध आहेत.
लहानमुले, संगीत शिकणारे कलावंत तसेच संगीतप्रेमी मंडळींकडून आमच्या ढोलक्यांना मागणी असते. या मंडळींच्या घरातील जो बुर्जुग,अनुभवी लोक आहेत ती सध्या ढोलकी बनविण्याचे काम करताना दिसत आहेत. मात्र अशा कुटुंबातील तरुण मंडळी तसेच महिला ढोलकी बनविण्यासाठी मदत करणे तसेच तयार ढोलकी बाजारपेठेत जावुन विकण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहेत.
Post Views: 35