पंढरपूर – देव कोणत्या रूपात भेटेल, सांगता येत नाही. कारण दिनांक ६ जून पासून तब्बल ११ देशांमधून प्रवास करीत पहिली ग्लोबल दिंडी पंढरपूरात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे या ग्लोबल वारी मध्ये लंडन ते पंढरपूर प्रवासात एक निरागस श्वान गेल्या ५ दिवसांपासून, जवळपास ६० ते ७० किमी अंतर या दिंडीतील भाविकांसोबत चालत आहे.
अगदी नातेपुते पासून न भुकंता, न थकता चक्क तो या वारीचा साथीदार बनला आहे. विशेष म्हणजे पालखी जिथे कुठे मुक्कामी असेल तिथे तो मुक्काम करतो आणि पुन्हा दिंडी सोबत चालत येतो.
वारकरी परंपरा शिकवते की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचा अंश आहे. कदाचित माऊलीनेच या मुक्या जीवाच्या रूपाने आपल्या वारीला साथ दिली असावी. त्याची निष्ठा, प्रेम आणि साथ पाहून मन भरून आले. ग्लोबल दिंडीचे प्रमुख अनिल खेडकर यांनी अत्यंत भावूक होऊन सोशल मीडियावर या बाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे,
लंडन ते पंढरपूर या ग्लोबल दिंडी मध्ये अनेक विलक्षण अनुभव त्यांना आले आहेत. ही ग्लोबल दिंडी सोमवारी (दि.२०) पंढरपूर येथे पोहोचली आहे.
दरम्यान आळंदी येथून प्रस्थान करताना प्रचंड प्रमाणात पाऊस असतानाही ग्लोबल दिंडी पुण्यात सुखरूप पोहचली, परब्रम्ह पांडुरंगाने दिंडी मध्ये कोणतेही विघ्न येऊ दिले नाही.
Post Views: 35