पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे वतीने आयोजित अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीच्या प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पहाटे शासकीय पूजा झाल्यानंतर ख्यातनाम गायक अमोल पटवर्धन यांची सुरेल अभंगवारी विठूराया चरणी संपन्न झाली.
सुरुवातीला वारकरी संप्रदायाचा बीजमंत्र जय जय राम कृष्ण हरी गजराने वातावरण भक्तिमय करत अनेक सुंदर अभंग अमोल पटवर्धन यांनी गायले त्यामध्ये आधी रचिली पंढरी, अबीर गुलाल उधळीत रंग,अवघे गरजे पंढरपूर,प्रथम तुला वंदितो,माझे माहेर पंढरी,वृंदावनी वेणू, आम्ही विठ्ठलाचे वारकरी,रुप सावळे सुकुमार,आदी अभंग सादर करत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर भैरवी ने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात त्यांना तितकेच सुंदर निरुपण विघ्नेश जोशी, तबला आदीनाथ कुटे, पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे, हार्मोनियम सागर जोशी तर टाळ पुजारी सरांनी करत कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम आणि भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कलाकारांनाही हा कार्यक्रम या आषाढी एकादशीची जणू सुंदर अनुभूती अविस्मरणीय ठरली.
Post Views: 9